शांघाईजवळ अमेरिकेचे लढाऊ विमाने; चीन-अमेरिका तणाव वाढला

Foto
अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अमेरिकेचे लढाऊ विमानांसह हेरगिरी करणारे विमानेही चीनच्या हवाई हद्दीभोवती घिरट्या घालत आहेत. अमेरिकेचे लढाऊ विमाने चीनच्या मुख्य भूमीजवळ पोहचू लागली आहेत. शांघाईपासून अतिशय जवळच्या अंतरावर अमेरिकेची विमाने आल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. मागील वर्षांपासून अमेरिका आणि चीनमध्ये वाद सुरू आहेत. व्यापार करार आणि त्यानंतर करोनाच्या संसर्गाने जगभरात फैलावलेल्या संसर्गाच्या मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. त्यातच चीनने दक्षिण चीन समु्द्रात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे या तणावात भर पडली आहे. तैवानच्या ताब्यातील बेटावर ताबा घेण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिकन नौदलाच्या युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैवानच्या मदतीसाठी दाखल झाली आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी एकमेकांची प्रत्येकी महावाणिज्य दूतावास बंद केली आहेत.
पेकिंग विद्यापीठाच्या थिंक टँक साउथ चायना सी स्ट्रॅटेजिक सिच्युएशन प्रोबिंग इनिशिएटीव्हनुसार, पी-8ए अ‍ॅण्टी सबमरीन लढाऊ विमान आणि ईपी-3ई विमाने रेकी करण्यासाठी तैवान स्ट्रेटमध्ये दाखल झाले. झेझियान्ग आणि फुजियानच्या किनार्‍यावर या विमानांनी गस्त घातली. याबाबत रविवारी सकाळी ट्विट करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित भागात गस्त घालणारे विमानं फुजियान आणि ताइवान स्ट्रेटच्या दक्षिण भागातून मागे फिरली असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकन नौदलाचे पी-8ए हे शांघाईजवळून ऑपरेट करण्यात येत आहे. त्याशिवाय युद्धनौका युएसएस राफेल पेराल्टा ही या विमानाच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. थिंक टँकच्या दाव्यानुसार, पी-8 ए, शांघाईपासून 76.5 किमी इतक्या अंतरावर दाखल झाले होते. मागील काही वर्षांत अमेरिकेच्या विमानांनी चीनच्या हद्दीपर्यंत इतक्याजवळ येण्याची ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरे विमान फुजियानपासून 106 किमी अंतरावर होते.
12 दिवसांपासून हालचाल सुरू
मागील 12 दिवसांपासून अमेरिकन लढाऊ विमाने चीनच्या हद्दीजवळ येत आहेत. सोमवारी इन्स्टिट्यूटने केलेल्या ट्विटनुसार, अमेरिकन नौदलाने ठउ-135 गस्त करणारे विमान तैवानच्या हवाई हद्दीत दाखल झाले असल्याची शंका व्यक्त केली होती. मात्र, तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने या दाव्यांबाबत काहीही भाष्य केले नाही. त्यानंतर एझ-3ए गुआंगडोन्गपासून 100 किमी अंतरावर गस्त घालत असल्याचे इन्स्टिट्यूटने ट्विट केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker